राज्यस्तरासाठी स्पर्धेसाठी झाली निवड
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावर शिक्षक तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या विज्ञान व गणिताचा जादूगार या स्पर्धेत कल्याणी सुखदेव तुपे गाडेकर जी. प. प्रा.शाळा वांगी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्या वांगी बुद्रुक, केंद्र भराडी, तालुका सिल्लोड येथे प्राथमिक पदवीधर शिक्षण सेवक आहेत. या स्पर्धेतील त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती, सहकारी शिक्षकवर्ग तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, इतर शिक्षकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत. आहे. त्यांच्या या यशामुळे तालुका सिल्लोड तसेच केंद्र भराडीचा नावलौकिक वाढला आहे.















